Balasaheb Thorat : विशाल पाटील यांना एबी फॉर्म दिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, सांगली आणि भिवंडीचा तिढा आजही आमच्यासाठी आजही आहे. कारण आमचे जे प्रमुख कार्यकर्ते होते जे उमेदवार म्हणून पुढे येत होते. ते अजून नाराजीने काहीना काही कृती करु पाहत आहेत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातलं ज्यांच्याशी चर्चा आम्हाला करायची आहे त्यांना बोलावलं होते. पण आमच्या सांगलीचे जे इच्छुक उमेदवार विशाल पाटील ते काही उपस्थित राहिले नाहीत. आमचा अजूनही प्रयत्न आहे की हा विषय मिटला पाहिजे. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे गेलं पाहिजे.
यासोबतच ते म्हणाले की,महाविकास आघाडी म्हणूनच आपलं निर्णय असलं पाहिजे. त्यामुळे अजूनही आम्ही विशाल पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. विशाल पाटील यांना एबी फॉर्म दिलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला अपेक्षा होती की, आम्हालाच ती जागा दिली जाईल. सांगली नैसर्गिकच आमची जागा आहे. ही वस्तुस्थिती आहे. आमचा उमेदवार आहे. परंपरा ती आहे. त्यामुळे ती आम्हाला मिळावी ही अपेक्षा होती त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना असणं साहाजिक आहे. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.