बाळासाहेब थोरात यांची ठाकरे गटावर नाराजी; म्हणाले...

बाळासाहेब थोरात यांची ठाकरे गटावर नाराजी; म्हणाले...

ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, आज उद्धवजींच्या शिवसेनेनं यादी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगली जाहीर करणं किंवा मुंबईमधल्या धारावी जिथे येते तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं मत आहे. त्यांनी असं जाहीर करायला नको होते. ज्यावेळीस आम्ही चर्चेमध्ये आहोत. एकत्र आघाडी आहे. तो आघाडी धर्म आहे तो सर्वांनीच पाळला पाहिजे. त्यामुळे त्यांनी ही जागा जाहीर करणं योग्य नाही.

आमचा आजही आग्रह या जागेंसाठी आहे. एवढंच नाहीतर भिवंडीच्या जागेसाठीसुद्धा आमचा आग्रह आहे. याबाबतीत ते जाहीर केलं आहे त्याबाबतीत शिवसेननं फेरविचार करावा असं मी म्हणेन. आघाडी धर्म म्हणून आम्ही तिघांनी घेतली पाहिजे दुदैवाने ती घेतलेली दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. दिल्लीलासुद्धा वस्तुस्थिती आम्ही कळवलेली आहे. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com