काँग्रेसमधील अंतर्गत वादानंतर बाळासाहेब थोरात, नाना पटोले पहिल्यांदाच एकत्र; म्हणाले..
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोन्ही बड्या नेत्यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीनंतर नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या परिषद नाना पटोले यांना थोरांतासोबत मनोमिलन झालं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नाना पटोले आणि थोरात या दोन्ही नेत्यांनी उत्तर दिलं.
नाना पटोले म्हणाले की, मी सुरवातीलाच प्रश्न उपस्थित केला होता. मी सांगितलं की आमच्या काँग्रेस पक्षात कुठेही कुठलाही वाद नाही. नागपूर आणि अमरावतीची निवडणूक जिंकण्यासाठी केलेलं एक वातावरण होतं. त्याचं मी सुरवातीलाच प्रदेशाध्यक्ष म्हणून सुतोवाच केलेलं होतं की आमच्यात कोणताही वाद नाही. बाळासाहेबांनी सुद्धा परवा सांगितलं की आमच्यात कुठलाही वाद नाही. पण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हा प्रयत्न फोल ठरला आहे. आता कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीच्या जागा आम्ही जिंकू, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
बाळासाहेब थोरात यांचा अपघात झाला. एच. के. पाटील पहिल्यांदा मुंबईत आले तर त्यांच्या घरी गेले. ते सर्वच नेत्यांना भेटले. पण त्यांचा अपघात झाल्याने ते त्यांच्या घरी जाऊन भेटले. तुम्ही समज केला की ते बाळासाहेबांची मनधरणी करायला गेले. आता त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून भेटायला गेले. मी हेच सांगू इच्छितो की, काहीच वादविवाद नाही, असं पटोले म्हणाले.
दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळास सुरुवात झाली. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधानसभेतील गटनेतेपदाचा राजानामा दिला होता.