Radhakrushna Vikhe Patil
Radhakrushna Vikhe PatilTeam Lokshahi

मंत्र्यांच्या आशीर्वादानेच राज्यात वाळू तस्करी; विखे पाटलांचा थेट महसूलमंत्र्यांवर आरोप

राज्यात वाळू तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

अहमदनगर | कुणाल जमदाडे :

राज्यात वाळू तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील विविध नद्यांमधून राजरोसपणे अवैध वाळू उपसा सुरू आहे. भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी यावरून महाविकास आघाडी सरकरावर (MVA Government) आरोप केले आहेत. या वाळू तस्करीला महसूलमंत्र्यांचाच आशीर्वाद असल्याचा गंभीर आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

विखे आणि थोरात यांचं राजकिय वैर राज्याला सर्वश्रुत आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाही. राज्यातील वाळू तस्करीवरून विखे पाटलांनी आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. महसूल मंत्र्यांच्या आशीर्वादानेच राज्यभर वाळूचा गोरखधंदा सुरू असल्याचा थेट आरोप विखे पाटलांनी केला आहे. आज त्यांचेच बगलबच्चे या धंद्यात असून अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला जातोय आणि वाळू तस्करांना पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे. राज्यात जिथे वाळूचे ठेके सुरू आहेत तिथे यांचेच बगलबच्चे अप्रत्यक्ष भागीदार आहेत. वाळू उपाशामुळे नद्या आणि नदीकाठचे शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. नगर, पुणे, ठाणे, रायगड याठिकाणी सुरू असलेल्या वाळू उपशांचे हप्ते कुणाला जातात..? अधिकाऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या जातात असं विखेंनी सांगितलं.

Radhakrushna Vikhe Patil
Jayant Patil : ...म्हणूनच आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार दिला

वाळू तस्करांना जो माज आलाय याचं कारण काय? असे प्रश्न विखे पाटलांनी उपास्थित केले आहेत. राज्य सरकारने वाळू उपशासाठी रात्री आणि दिवसाही परवानगी दिली आहे. विकासाचं धोरण आणण्याकरता सरकारला वेळ मिळत नाही मात्र वाळूचा व्यवसाय वाढवून काळा पैसा निर्माण करण्यासाठी मंत्रिमंडळात धोरण ठरवलं जातं. वाळू तस्करीला मंत्र्याचा देखील आशिर्वाद असून या खात्याचे मंत्री थेट या सगळ्यांना पाठीशी घालत आहेत. महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वाळूच्या पैशातूनच सामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचे कार्यकर्ते असल्याचा घणाघात विखे पाटलांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com