ताज्या बातम्या
तर यावेळी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; बच्चू कडूंनी सरळ सांगूनच टाकले
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र तसे झाले नाही.
यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राज्यात सत्तांतर झालं त्यानंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी सरकार स्थापन केलं. तेव्हापासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, आता मंत्रिमंडळाचा विस्तार करून नाराजी ओढावून घेण्याची मानसिकता सरकारची नाही. आमच्या सरकारचा कार्यकाळ आता सात ते आठ महिने उरला आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्यानं नाराजी असण्याचे कारण नाहीच. २०२४ नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.