Baba Siddiqui Shot | मरिन लाईन्समध्ये बाबा सिद्दीकींवर अंत्यसंस्कार होणार | Marathi News

Baba Siddiqui Shot | मरिन लाईन्समध्ये बाबा सिद्दीकींवर अंत्यसंस्कार होणार | Marathi News

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले.
Published by :
shweta walge
Published on

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. या घटनेची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज बाबा सिद्दीकी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मरीन लाईन्स परिसरातील बडा कब्रस्तान याठिकाणी बाबा सिद्दींकींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर पहाटे साडे पाच वाजता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंधेरीतील कूपर रूग्णालयात आणण्यात आला. यानंतर आठ वाजता बाबा सिद्दिकी यांचं शवविच्छेदन करण्यास सुरुवात होईल. यावेळी व्हीडिओग्राफीदेखील केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी साधारण तीन ते चार तासांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितलं जात आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच राजकीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मुस्लीम धर्मानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासाठी नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येणार आहे. ही प्रार्थना रात्री 7 वाजता त्यांच्या मकबा हाईट या राहत्या घरी होईल.

दरम्यान, हल्लेखोर 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन रहात होते. चार जणांनी मिळून बाबा सिद्धीकी याच्या हत्येची सुपारी घेतली होती. पंजाबमध्ये एका जेलमध्ये असताना हे तिघं जणं एकमेकांच्या संपर्कात आले होते. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गॅगचा एक सदस्य होता त्याच्या संपर्कात हे तिघं आले. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेची तीन पथकं मध्यप्रदेश, हरियाणा आणि दिल्ली येथे रवाना झाली असल्याची माहिती सूत्रांची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com