आयुर्वेद-ॲलोपॅथी डॉक्टरांचे काम वेगळे, समान वेतनाचा आदेश रद्द - सर्वोच्च न्यायालय
Admin

आयुर्वेद-ॲलोपॅथी डॉक्टरांचे काम वेगळे, समान वेतनाचा आदेश रद्द - सर्वोच्च न्यायालय

आयुर्वेद व्यावसायिक हे एमबीबीएस पदवीधारक डॉक्टरांच्या समकक्ष मानले जाण्यास पात्र आहेत, असा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने २०१२ मध्ये दिला होता.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आयुर्वेद व्यावसायिक हे एमबीबीएस पदवीधारक डॉक्टरांच्या समकक्ष मानले जाण्यास पात्र आहेत, असा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने २०१२ मध्ये दिला होता.न्या. व्ही. रामसुब्रमण्यम व न्या. पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने सांगितले होते की, दोन्ही पद्धती ज्या उपचार विज्ञानाचा अवलंब करतात त्यांच्या स्वरूपामुळे आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ॲलोपॅथी डॉक्टर आकस्मिक कामे करण्यास सक्षम आहेत. त्यांनाच गंभीर जखमींवर तातडीचे उपचार करावे लागतात. ते आयुर्वेदिक डॉक्टर करू शकत नाहीत.

खंडपीठाने म्हटले की, आयुर्वेद आणि पर्यायी किंवा स्वदेशी औषध पद्धतीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे,हे मान्य. मात्र, दोन्ही श्रेणींतील डॉक्टर एकसारख्या वेतनास पात्र ठरविण्यासाठी समान पद्धतीचे काम करत नाहीत. ॲलोपथीच्या डॉक्टरांना दिवसाला शेकडो रुग्णांवर उपचार करावे लागतात, तसे आयुर्वेद व्यावसायिकांना करावे लागत नाहीत. असे सांगितले.

ॲलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवा आयुर्वेदाच्या डॉक्टरांना द्याव्या लागत नाहीत. असे न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे आयुर्वेद-ॲलोपॅथी डॉक्टरांचे काम भिन्न असून त्यांचा समान वेतनाचा आदेश रद्द असा गुजरात उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com