Avinash Jadhav : मनसेची तिथे 2 लाख मतं आहेत, मनसेच्या मतांच्या जीवावर नरेश म्हस्के निवडून येतील
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता मनसेचे अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया आली आहे. अविनाश जाधव म्हणाले की, नरेश म्हस्के यांचा विजय खूप सोपा आहे. कारण भारतीय जनता पक्षाचे मोठ्या संख्येने तिथे नगरसेवक आहेत. मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व असलेली लोकसभा आहे. राजन विचारेंच्या बाबतीमध्ये मागील दहा वर्षात जर तुम्ही त्यांचा कार्यकाळ पाहिला तर मागच्या 2 वर्षात ज्यावेळेपासून सरकार तुटल्यानंतर ते दिसायला लागले. पहिलं आठ वर्ष आम्हाला खासदार शोधावं लागत होते.
यासोबतच ते म्हणाले की, मला असं वाटत नाही की, लढाई खूप कठीण असेल. मनसेची तिथे 2 लाख मतं आहेत. मागच्या विधानसभेमध्ये मनसेला 2 लाखांच्या आसपास मतदान आहे. मनसेच्या मतांच्या जीवावर नरेश म्हस्के निवडून येतील. असं अविनाश जाधव म्हणाले.