Avinash Bhosale
Avinash BhosaleTeam Lokshahi

अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत CBI कोठडी

डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय
Published on

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना आजही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने आज सुनावणी केली.

Avinash Bhosale
Hanuman Birthplace : शास्त्रार्थ सभेत अभूतपूर्व राडा; साधू-महंतांमध्ये हमरीतुमरी

अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयकडून काही महिन्यापुर्वी छापेमारी करण्यात आली होती. डीएचएफएल व येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणी अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी झाली होती.

बँक फसवणूक प्रकरणी अखेर भोसले यांना सीबीआयने अटक केली. अविनाश भोसले यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 मेपर्यंत त्यांच्या वरळीच्या घरात नजरकैदेत ठेवावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. यानंतर आज झालेल्या सुनावणीत अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे.

Avinash Bhosale
TET scam case : शिक्षण आयुक्त तुकाराम सुपेला जामीन मंजूर

कोण आहेत अविनाश भोसले?

अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Avinash Bhosale
BMC Election 2022 : मुंबईत यशवंत जाधव यांना धक्का, पाहा कोणाच्या वार्डात काय झाले?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com