भीमजयंतीनिमित्त नागसेन फेस्टिव्हलमध्ये विविध उपक्रमांची रेलचेल; जस्टीस के.चंद्रु, सौमित्रची उपस्थिती
मिलिंद सन्मान पुरस्काराने होणार मान्यवरांचा गौरव, भीमजयंती निमित्त नागसेनवनातील आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने दि.३१ मार्च,०१ व ०२ एप्रिल रोजी ३ दिवसीय नागसेन फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे ८ वे वर्ष असून यंदाही भरगच्च उपक्रमाचे आयोजन करून जल्लोषात हा महोत्सव साजरा केला जाणार आहे.
दि.३१ मार्च रोजी सायं ६ वाजता मद्रास येथील निवृत्त न्यायाधीश जस्टीस के चंद्रु यांच्या हस्ते नागसेन फेस्टिव्हल चे उदघाटन होईल चंद्रु यांच्या कार्यावर आधारित जयभीम हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला असल्याने त्यांची उपस्थिती हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी भंते विशुद्धानंद बोधी यांना धम्मचळवळीतील उल्लेखनीय कार्यासाठी नागसेन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
मराठी सिने सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते किशोर कदम (सौमित्र) यांचे 'चित्रपटातील समाज वास्तव आणि वास्तवातील समाजमन' या विषयावर व्याख्यान होईल. तर अविनाश बनकर यांच्या ग्रुप चे लाठी काठी चे प्रात्यक्षिक होईल. समाज मनावरील आभासी जगतावर भाष्य करणाऱ्या राकेश शिर्के लिखित व अशोक निकाळजे दिग्दर्शित 'अॅडमीन ' ह्या एकांकिकेचा प्रयोग ८:३० वा. सादर होईल. व्हॉट्सअप या मोबाईल फोनवरील अॅपवर आधारित ही एकांकिका असणार आहे.
सोबत
जस्टीस के चंद्रु,सिने अभिनेते किशोर कदम,भंते विशुद्धानंद बोधी यांचे छायाचित्र व फेस्टिव्हल चे बोधचिन्ह जोडले आहे.
डॉ.वाल्मिक सरवदे यांची भारतीय वाणिज्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा विशेष सत्कार व सिनेट सदस्य डॉ.शंकर अंभोरे, डॉ.उमाकांत राठोड, डॉ.तुषार मोरे, के एम बनकर, यांना मिलिंद सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. सन २०१४ मध्ये देशभरात चर्चा झालेल्या जवखेडे दलित हत्याकांडात पीडितांच्या कुटुंबियांना आरोपी केल्याच्या प्रकरणात पीडितास मोफत कायदेशीर मदत करून न्याय मिळवून दिल्याने अॅड.सुनील मगरे, अॅड.सी एस गवई, अॅड.सिद्धार्थ उबाळे, अॅड.नितीन मोने यांचा सत्कार जस्टीस चंद्रु यांच्या हस्ते करण्यात येईल.यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक उमेश नागदिवे, समाजकल्याण उपायुक्त दिपक खरात, विठाई बोरडे, प्रा.डॉ.अनिल डोंगरे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दुसऱ्या दिवशी शनिवारी दि. १ एप्रिल रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्त्यांची राष्ट्रीय परिषद संपन्न होईल त्यात विविध विद्यापीठातील आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ६ वाजता बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक अतुल भोसेकर हे 'बौद्ध संस्कृतीचा वारसा आणि वर्तमानातील संस्कृती संघर्ष' या विषयावर आपले विचार व्यक्त करतील ह्यावेळी प्राचार्य डॉ.यशवंत खडसे हे अध्यक्षस्थानी असतील तर डॉ.पुष्पा गायकवाड,प्रशांत पवार (वेब एडिटर,लोकशाही न्यूज) ह्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे।
तत्पूर्वी सिंहली भाषेतील बौद्ध गाथेवर देविका बोर्डे यांचे नृत्य सादरीकरण होईल. सोय ८:३० वाजता 'एल्गार समतेचा' हे महिला कवयित्रींचे राज्यस्तरीय कवी संमेलन होईल.अध्यक्षस्थानी जेष्ठ कवयित्री छाया कोरेगावकर असतील तर सूत्रसंचालन कविता मोरवणकर ह्या करतील. मिलिंद चे माजी विद्यार्थी निवृत्त पोस्ट अधिकारी नागेश माटे निर्मित फ्रेंड्स ऑर्केस्ट्रा च्या वतीने सेक्सोफोन वरील भीमगिते सादर करण्यात येतील. घटम (मटका) वादन करून तेजस खरात हे भीमगीते सादर करतील
वादक विक्रम पवार हे पर्ण वाद्यावर भीमगित सादर करतील.
रविवार दि.०२ रोजी सायं.६ वाजता गौरव सोमवंशी यांचे 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी'ची १०० वर्षे आणि समकालीन आर्थिक धोरण ' या विषयावर व्याख्यान होईल तर पंजाब येथील गुरिंदर आझाद हे आंबेडकरी विद्यार्थी परिषदेतील ठरावाचे वाचन करतील यावेळी प्राचार्य इंद्रजित आल्टे, इंजि राहुल जाधव,वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी अमोल झोडपे,प्राचार्य टी ए कदम,प्राचार्य प्रमोद हिरोडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यानंतर विपीन तातड निर्मित रॅप टोली च्या गीतांचे सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप होईल. मोहोत्सवाच्या तिन्ही दिवस विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मिलिंद सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
नागसेन फेस्टिव्हल ला मोठ्या संख्येने आजी माजी विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे अवाहन मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने निमंत्रक सचिन निकम,हेमंत मोरे,प्रा.किशोर वाघ ,धनंजय बोर्डे,अविनाश कांबळे,प्रा.प्रबोधन बनसोडे,कुणाल भालेराव,चिरंजीव मनवर,सनी देहाडे,गुणरत्न सोनवणे,सागर ठाकूर,विशाल सरपे,राहुल जाधव यांनी केले आहे.
सोबत- जस्टीस के चंद्रु,सिने अभिनेते किशोर कदम,भंते विशुद्धानंद बोधी यांचे छायाचित्र व फेस्टिव्हल चे बोधचिन्ह जोडले आहे.