Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रेणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी म्हणजेच आज 12 मे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रेणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी म्हणजेच आज 12 मे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आलं आहे.

मध्य रेल्वे

कुठे: माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर

कधी: सकाळी 11:10 ते दुपारी 3:10 पर्यंत

परिणाम: ब्लॉकदरम्यान CSMT येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.

हार्बर रेल्वे

कुठे: कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर

कधी: सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत

परिणाम: या कालावधीत वाशी, बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे

कुठे: सांताक्रूझ-गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी: सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 पर्यंत

परिणाम: ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालविण्यात येतील. विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकांत लोकल थांबणार नाहीत. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com