Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' मार्गावर मेगाब्लॉक; वेळापत्रकात बदल जाणून घ्या...
मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी (16 जून) म्हणजेच आज मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळ मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. या मेगाब्लॉकबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा आणि मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी 10:25 ते दुपारी 2:45 पर्यंत
परिणाम : डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यानंतर या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यावर थांबणार आहेत, तसेत इच्छित ठिकाणी वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. ठाण्यातून सकाळी 10:50 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.
हार्बर रेल्वे
कुठे :सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या मार्गावर
कधी : सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकपूर्वी शेवटची पनवेल लोकल सीएसएमटीवरुन 10:18 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली पनवेल लोकल सीएसएमटीवरुन दुपारी 3:44 वाजता सुटणार आहे. तर पनवेलवरुन सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल सकाळी 10:05 वाजता सुटेल, तर ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी 3:45 वाजता सुटेल. तसेच ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.