विरोधी पक्षाच्या नेत्यांना ठरवून तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न - महेश तपासे
भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्याकरीता केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असून विरोधकांना ठरवून तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची शंका देशातील जनतेच्या मनात असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे.
महेश तपासे म्हणाले की, कोर्टाने खासदार संजय राऊत यांचा पत्राचाळीशी काहीही संबंध नाही, तरी त्यांना गोठवण्यात आले. नेत्यांना ठरवून टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. ईडी कारवाई झपाट्याने करते मात्र तपासात दिरंगाई करते. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची नावे टाकण्यात आली. जेणेकरून त्यांच्या मनात भीती निर्माण व्हावी अशी चार महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या मनात भय निर्माण करण्यासाठी ही नावे टाकली का असा सवालही कोर्टाने केला असल्याचे महेश तपासे यावेळेस म्हणाले.
दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत तुरुंगातून सुटल्यानंतर म्हणाले की, आज तीन महिन्यांनी हातात घड्याळ बांधले आहे. तुरुंगातील यातना कुणाच्याही वाट्याला येऊ नये. तुरुंगात राहणं फारच कठीण असतं. तुरुंगात राहणे काही आनंदाची गोष्ट नाही. तुरुंगातील भिंतींसोबत बोलावे लागते. वीर सावरकर, लोकमान्य टिळक, अटल बिहारी वाजपेयी जेलमध्ये कसे राहीले असतील, याचा मी नेहमी करतो.