उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा

उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा

उमेश पाल अपहरण प्रकरणात माफिया अतिक अहमदला आज दोषी ठरवण्यात आले आहे.
Published on

प्रयागराज : उमेश पाल अपहरण प्रकरणात माफिया अतिक अहमदला आज दोषी ठरवण्यात आले आहे. यासोबतच दिनेश पासी आणि त्यांचे वकील खान सुलत हनिफ यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच तिघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर, अतिकचा भाऊ अश्रफ उर्फ ​​खालिद अझीम याच्यासह सात आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा
'50 खोके...' पडणार महागात? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राऊतांना न्यायालयाचे समन्स

काय आहे प्रकरण?

बाहुबली अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अझीम उर्फ ​​अश्रफ यांना न्यायालयात हजर करण्यात आले. 2005 मध्ये बहुजन समाज पक्षाचे (BSP) तत्कालीन आमदार राजू पाल हत्याकांडातील साक्षीदार उमेश पाल याच्या अपहरण प्रकरणी दोघांना आज हजर करण्यात आले. 2005 मध्ये राजू पाल यांच्या हत्येचा मुख्य साक्षीदार उमेश पाल याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही अतिक आणि अश्रफ यांच्यावर आहे. 24 फेब्रुवारी रोजी प्रयागराजमध्ये उमेश पाल आणि त्याच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन पोलिसांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पाल यांची पत्नी जया यांच्या तक्रारीवरून अहमद अन्य नऊ जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

25 जानेवारी 2005 रोजी बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्येनंतर तत्कालीन जिल्हा पंचायत सदस्य उमेश पाल यांनी या हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे पोलिसांना सांगितले होते. 28 फेब्रुवारी 2006 रोजी अतिक अहमदच्या दबावापुढे झुकण्यास नकार दिल्याने उमेशने आपले अपहरण केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, उमेश पाल खून प्रकरणासह 100 हून अधिक गुन्हेगारी गुन्ह्यांमध्ये अतिक अहमदचे नाव आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com