J&K Assembly Election 2024: कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये होणार पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक

J&K Assembly Election 2024: कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये होणार पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक

Jammu And Kashmir Assembly Election 2024: भारतीय निवडणूक आयोगानं अखेर जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका शुक्रवारी जाहीर केल्या आहेत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

Jammu And Kashmir Assembly Election 2024: भारतीय निवडणूक आयोगानं अखेर जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर हरियाणात एकाच टप्प्यात 1 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. सन 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर आणि जम्मू -काश्मीर हे राज्य केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. याआधी 2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. मे 2022 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकन झाल्यानंतर विधानसभेच्या जागांची संख्या आता 90 झाली आहे. जम्मूमध्ये विधानसभेच्या 43 आणि काश्मीर खोऱ्यात 47 जागा आहेत. यापूर्वी 2014 मध्ये विधानसभेच्या 87 जागांवर निवडणूक झाली होती.

जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 90 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यांपैकी 74 सर्वसाधारण, अनुसूचित जमाती-7 आणि अनुसूचित जाती -9 आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 87.09 लाख मतदार आहेत. ज्यामध्ये 44.46 लाख पुरुष, 42.62 लाख महिला, 3.71 लाख प्रथमच मतदार आणि 20.7 लाख तरुण मतदार आहेत. 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

J&K Assembly Election 2024: कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये होणार पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक
BMC: बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना विनम्र आवाहन
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com