महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर जळगाव जामोदमध्ये प्राणघातक हल्ला, गंभीर जखमी अवस्थेत अकोला येथील हॅास्पिटलमध्ये दाखल.
Published by :
shweta walge
Published on

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात प्रशांत डिक्कर गंभीर जखमी झाले आहेत.

शेगाव कालखेड गावाजवळ अज्ञात दुचाकी स्वारांकडुन सकाळी साडेपाच ते पावणे सहा दरम्यान हल्ला झाला आहे. हल्ल्यानंतर प्रशांत डिक्कर यांना शेगावमधील हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने डिक्कर यांना अकोला येथील हॅास्पिटल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी पाठविण्यात आले आहे. शेगावमधील हॅास्पिटलमध्ये डिक्कर बेशुद्ध अवस्थेत होते. छातीमध्ये त्याच वेळी दुखू लागल्याने अटॅक देखील आल्याची शक्यता आहे. डिक्कर समर्थकांकडून हा हल्ला भाजपच्या गुंडानी केला असल्याचे सांगितले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com