कत्राटदारांचे नव्हे, मुंबईकरांचे बजेट - आशिष शेलार
गेल्या पंचवीस वर्षात कंत्राटदार सांगेल तीच कामे, आणि कंत्राटदार सांगेल तेच बजेट असे जे चित्र होते ते आज अखेर बदलले आहे. मुंबई महापालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या मागण्या , अपेक्षा मागवून त्यानुसार तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हे बजेट कट कमिशन आणि कंत्राटदारांचे नसुन मुंबईकरांचे आहे. मुंबईतील हवा प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून गेले आहे त्यामुळे याबाबत तातडीने उपाय योजना करा, अशी विनंती मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही केली होती त्यानुसार त्यांनी तातडीने पालिका आयुक्तांना सुचना केल्या होत्या. त्यामुळे यावेळी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी अर्थसंकल्पात तब्बल 1500 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली त्याचे आम्ही स्वागत करतो. असे शेलार यांनी सांगितले.
मुंबईकरांना चालण्यासाठी फुटपाथ देणे ही पालिकेची जबाबदारी मान्य करुन 9 मिटर पेक्षा मोठ्या प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ देण्याची भूमिका पालिकेने घेतली त्याचे मुंबईकरांच्यावतीने स्वागतच. नवे संकल्प केलेले नाहीत त्यामुळे काही अपेक्षा आमच्या अजूनच्या होत्या. पण करवाढ मुंबईकरांवर लादली नाही. रस्ते, आरोग्य, कोस्टलरोड, मलजल नित्सारण,अशा पायाभूत सेवा सुविधांंना केलेली तरतूद ही जमेची बाजू आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तृतीय पंथीय यांचा संवेदनशीलपणे अर्थसंकल्पात विचार केला गेला आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे कंत्राटदारांच्या मर्जीतला हा अर्थसंकल्प नसून मुंबईकरांच्या मागणीतला अर्थसंकल्प आहे. असे शेलार यांनी म्हटले आहे.