राहुल गांधींच्या सभेवरुन आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला; म्हणाले...

राहुल गांधींच्या सभेवरुन आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला; म्हणाले...

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची दादरच्या चैत्यभूमीवर सांगता होणार आहे. यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर आज (ता. १७) इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे.
Published by :
shweta walge
Published on

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची दादरच्या चैत्यभूमीवर सांगता होणार आहे. यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर आज (ता. १७) इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. यावेळी राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी 5 वाजता राहुल गांधींची ही सभा होणार आहे. दरम्यान, या सभेपूर्वी राहुल गांधी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत. यावरुनच आशिष शेलार यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. तुम्हाला हिंदुत्वाशी न्याय करण्याची उत्तम संधी आलीय, ठाकरेंनी राहुल गांधींनी सावरकर स्मारकात घेऊन जावे. असा सल्ला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

आशिष शेलार यांचं ट्विट

श्रीमान उद्धव ठाकरे यांना आज हिंदुत्वाशी "न्याय" करण्याची एक उत्तम संधी आलीय.

शिवतीर्थावर "भारत जोडो न्याय सभेला" जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी श्रीमान राहुल गांधी यांना घेऊन सावरकर स्मारकात जावे..

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करावे...

स्मारकात ठेवण्यात आलेला "कोलू" ओढून राहुल गांधी यांना प्रायश्चित्त करण्याची एक संधी उपलब्ध करून द्यावी..

तुमचं हिंदुत्व, महाराष्ट्र प्रेम, मराठीपण सिद्ध करण्यासाठी आलेली संधी तुम्ही घालवलीत..

तर आज महाराष्ट्र तुमच्या "भगव्या" शालीचा रंग बदला यावर शिक्कामोर्तब करेल!

दरम्यान, इंडिया आघाडीच्या या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन (माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी) आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य यांच्यासह इंडियाचे १५ हून अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची पहिली सभा मुंबईत होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com