asani cyclone महाराष्ट्रात 24 तासांत पावसाची शक्यता
असनी चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (whether department)व्यक्त केली आहे. असनी चक्रीवादाळामुळे (asani cyclone) पाऊस पडणार आहे. परंतु दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातही पारा 40 च्या वर राहण्याचा अंदाज आहे.(whether update)
आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगालमध्ये असनी चक्रीवादळ धडकेल आहे. यामुळे या राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे. महाराष्ट्रातही काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात काही भागात तुरळक पाऊस पडेल.
मॉन्सूनवर परिणाम नाही
असनी चक्रीवादळाचा मॉन्सूनवर फारसा परिणाम होणार नाही. पश्चिमेच्या वाऱ्याची दिशा अंदमान कडून केरळकडे जाईल आणि त्यानंतर भारतात मॉन्सून दाखल होईल. या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात महाराष्ट्रात पूर्व मॉन्सून पावसाची शक्यता आहे.