Aryan Khan
Aryan Khan Team Lokshahi

आर्यनला ड्रग्ज प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाला; STI च्या तपासात गंभीर बाबी आल्या समोर

आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर एनसीबी तपासातील गंभीर चुका समोर येण्याची शक्यता.
Published by :
Sudhir Kakde
Published on

मुंबई : NCB ने शुक्रवारी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी क्लीन चिट दिली. या प्रकरणात आता तपासात अनेक गंभीर बाबी समोर आल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणात अशा अनेक गोष्टी होत्या, ज्यामुळे आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे. त्यापैकी महत्वाचं म्हणजे छाप्याचे कोणतेही व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा व्हॉट्सअ‍ॅप चॅटविरुद्ध कोणताही पुरावा नव्हता. विशेष तपास पथकाच्या अधिकार्‍यांना असं आढळून आलं की, NCB टीमने अनेक गंभीर चुका केल्या असून आर्यन खानला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे.

Aryan Khan
शिवसेना आमदाराच्या त्रासामुळे महिलेने मागितली आत्महत्येची परवानगी

एनसीबीने शुक्रवारी 2021 च्या खटल्यातील 14 आरोपींविरुद्ध मुंबई न्यायालयात सुमारे 6,000 पानांचं आरोपपत्र दाखल केलं. NCB अधिकार्‍यांनी सांगितलं की, या प्रकरणाच्या अनेक टप्प्यांवर तपासात त्रुटी होत्या. क्रूझमधून बाहेर पडल्यावर त्या सर्वांविरुद्ध अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याचं समान कलम लावण्यात आलं होतं. एविन साहूच्या प्रकरणाप्रमाणेच आरोपींकडे कोणतेही ड्रग्ज नव्हते. विशेष म्हणजे केस करण्यासाठी कोणतीही वैद्यकीय चाचणी केली गेली नव्हती.

मोहक जैस्वालच्या प्रकरणातही त्याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडली नाहीत. परंतु एसआयटीच्या तपासात त्यानं आपल्या मित्रांसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे जयस्वाल यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. एसआयटीने चार क्रूझ आयोजकांना सोडलं, कारण त्यांनी क्रूझ पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये ते फक्त इव्हेंट मॅनेजमेंटसाठी जबाबदार होते आणि त्यांना इतर कुठल्याही गोष्टींची माहिती नसल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेणाऱ्या टीमने नियमांचं पालन केलं नाही. छाप्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग, आरोपींची वैद्यकीय तपासणी आणि व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे केलेल्या आरोपांमध्ये पुराव्याची पडताळणी यासारख्या आवश्यक नियमांचं पालन करण्यात आलं नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com