तुमच्या सोबतचा माणूस बाळासाहेबांचा अपमान करतो आता कोणाला जोडे माराल? - अरविंद सावंत
Admin

तुमच्या सोबतचा माणूस बाळासाहेबांचा अपमान करतो आता कोणाला जोडे माराल? - अरविंद सावंत

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या बाबरी मशीदसंदर्भातील विधानावरुन नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सुरज दहाट, अमरावती

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या बाबरी मशीदसंदर्भातील विधानावरुन नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावरुन चंद्रकांत पाटलांवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अरविंद सावंत म्हणाले की, बाबरी मज्जिद पडली तेव्हा बाळासाहेबांचा काहीही संबंध नव्हता असे वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर तुमच्या सोबतचा माणूस बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करतो, आता कोणाला जोडे माराल? बाळासाहेबांची शिवसेना,,आम्ही बाळासाहेबांचे विचार अस म्हणता, तुमच्यासोबत चा माणूस चक्क बाळासाहेबांचा अपमान करतो, हिम्मत असेल आणि स्वाभिमान असेल तर राजीनामे द्यावे. लांडग्यानी वाघाचे पांघरून घातले तर वाघ होत नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com