अरविंद केजरीवाल अणि गुजरात पोलिसांमध्ये वादावादी, केजरीवाल म्हणाले,रोखू शकत नाही....
देशात सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड गोंधळ सुरु आहे. अशातच सर्व राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी सज्ज झालेले असताना. याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल हे गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमध्ये आम आदमी पक्ष चांगलाच सक्रिय झाला आहे. आप अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री हे गुजरातमधील विविध भागात सभा घेत असून ते लोकांशी संवादही साधत आहे. अशातच प्रचारासाठी निघालेले अरविंद केजरीवाल रिक्षाने जात असताना पोलिसांशी त्यांची वादावादी झाल्याची घटना समोर आली आहे.
नेमकं काय घडलं ?
एका कार्यक्रमा दरम्यान रिक्षा चालकाने केजरीवाल यांना घरी येऊन जेवण करण्यासाठी विंनती केली. त्यानंतर केजरीवाल यांनी होकार देत, तुम्ही आठ वाजता माझ्या हॉटेलवर या, आम्ही तुमच्यासोबत ऑटोने तुमच्या घरी येऊ. असे म्हणाले. त्यानंतर अरविंद केरीवाल हे अहमदाबादमध्ये रिक्षात बसून रिक्षा चालकाच्या घरी जेवणासाठी जात होते. मात्र सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी त्यांना थांबवले. यादरम्यान त्यांची पोलिसांशी वादावादी झाली. या घटनेचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
त्या व्हिडिओ मध्ये केजरीवाल पोलिसांना म्हणता की, ''तुम्ही मला काय सुरक्षा द्याल. मला सुरक्षा देऊ शकत नाही, असं बोलणं ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे.'' यादरम्यान पोलिस अधिकारी म्हणतात की, हा प्रोटोकॉल आहे. यावर केजरीवाल म्हणाले की, ''आम्हाला तुमचा प्रोटोकॉल आणि तुमची सुरक्षा नको आहे. तुम्ही मला सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून रोखू शकत नाही. मला तुमचे संरक्षण नको आहे. तुम्ही मला जबरदस्ती सुरक्षा देऊ शकता नाही. तुम्ही मला अटक ही करू शकत नाही.'' हा वाद झाल्यानंतर केजरीवाल रिक्षाचालकाच्या घरी गेले त्यांनी जेवण केले.