Kirit Somaiya, Sanjay Raut
Kirit Somaiya, Sanjay RautTeam Lokshahi

संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी; सोमय्यांच्या कुटुंबावर आरोप करणं भोवणार?

Arrest Warrant Against Sanjay Raut : संजय राऊत आता यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

संजय राऊत यांच्याविरोधात शिवडी कोर्टानं अटक वॉरंट जारी केलेलं आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन कोर्टाने हे वॉरंट जारी केलेलं आहे. संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं मेधा सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात काही महिन्यांपूर्वी भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अत्यंत टोकाला पोहोचला होता. यादरम्यान, किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. तर संजय राऊत हे या आरोपांविरोधात एकाकी लढत देताना पाहायला मिळत होते. यावेळी किरीट सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

संजय राऊत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत तुमच्यावर मानहाणीचा दावा करु असा इशारा सोमय्यांनी दिला होता. त्यानंतर सोमय्यांत्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात कोर्टात धाव घेतली होती. त्यावरुन आता शिवडी कोर्टाने संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट जारी केलं आहे. संजय राऊत यांना कोर्टात हजर राहण्यास देखील सांगितलं होतं. मात्र ते हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

Kirit Somaiya, Sanjay Raut
मेट्रोचा विषय घेऊन सोमय्या पुन्हा मैदानात; आता निशाण्यावर फक्त 'ठाकरे'

दरम्यान, राज्यामध्ये झालेल्या मोठ्या सत्तांतरानंतर राजकीय घमासान थांबेल अशी शक्यत होती. मात्र आता 40 आमदारांचा गट फूटून भाजपमध्ये गेल्यानंतर दुसरी लढाई शिवसेना वाचवण्यासाठी सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. सत्तागेल्यानंतर शिवसेनेला आता पक्ष आणि संघटना वाचवणं महत्वाचं असणार आहे. भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांनी आमचा गट हीच मूळ शिवसेना असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्यासमोर मात्र नवं आव्हान निर्माण झालं आहे. आज त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आहे. शिवसेनेच्या चिन्हाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, धनुष्यबाण हे चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. याचा अर्थ असा अजिबात नाही, की चिन्ह बदलणार आहे. कायदेतज्ञांशी बोलून मी हे तुम्हाला सांगतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. मात्र फक्त धनुष्यबाण हाती घेतलेल्या लोकांची सुद्धा चिन्ह मतदार बघत असतात असंही ते पुढे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com