उपोषण सुरू असतानाच जरांगेंविरोधात अटक वॉरंट; नेमकं प्रकरण काय?
नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या सुनावणीला हजर न राहील्याने अटक वॉरंट काढले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनवेळा समन्स बजावले होते. मात्र, आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.
यापूर्वीही जरांगे यांच्याविरोधात न्यायालयात गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानंतर जरांगे मे अखेरिस न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने मनोज जरांगे यांना 500 रुपयांचा दंड ठोठावून पुढील सुनावणीला नियमितपणे हजर राहण्याच्या अटींवर वॉरंट रद्द केले होते. परंतु, त्यानंतरही जरांगे सुनावणीला गैरहजर राहिल्याने अखेर न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे.