ताज्या बातम्या
मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर जरांगे पाटील यांच्या भेटीला; आरक्षणाचा प्रश्न सुटेल का?
जालनात शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या मराठा समाजाच्या तरुणांचे उपोषण मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात सुरू होते.
जालनात शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या मराठा समाजाच्या तरुणांचे उपोषण मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात सुरू होते. मात्र या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघालं आहे. यावरच मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना जालन्यात एक महत्त्वाचा निरोप घेऊन पाठवलं आहे.
यावेळी अर्जुन खोतकरांनी चर्चेसाठी दार खुलं करा, अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांना केलं. यावेळी जरांगे यांनी आपण चर्चेला तयार असल्याच सांगितलं. यावेळी खोतकर यांनी काही कागदपत्रे दाखवत मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्रे दिली जातील, असं लिखित आश्वासन दिलं. यावेळी संबंधित कागदपत्रांमध्ये मनोज जरांगे यांनी दुरुस्ती सांगितली. त्यानुसार अर्जुन खोतकर यांनी दुरुस्ती देखील केली.