अब्दुल सत्तार म्हणतात खोतकर शिंदे गटात येणार, मात्र खोतकर म्हणाले, मी...
राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटात आघाडीवर असणारे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे आज औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांच्या सोबत तळ्यात-मळ्यात अवस्थेत असलेले शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) हे देखील उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन खोतकर हे शिंदे गटात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दिल्लीत एकनाथ शिंदे यांची खोतकऱांनी भेट देखील घेतली होती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासोबत खोतकरांचे असलेले वाद हे सर्वज्ञात आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे वाद मिटवण्यात आल्याचं रावसाहेब दानवे यांनी देखील स्पष्ट केलं होतं. यावेळी अर्जुन खोतकर यांनी आपली भूमिका आजही स्पष्ट केली नसली तरी, अब्दुल सत्तार यांनी मात्र ते शिंदे गटात येतील असं म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे (CM Eknath Shinde) गटाच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलच्या फॉर्मुल्यावर सहमती झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत अजूनही अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राज्यात महाविकास आघाडीचं (MVA Government) सरकार पडल्यानंतर नवीन सरकार स्थापन झालं, मात्र सध्या या सरकारमध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही दोनच पदं असल्यानं विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होतेय.
मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला असून, याला शिंदे गटानेही सहमती दर्शवल्याचं बोललं जातंय. खातेवाटपावरून शिंदे गटाची काहीशी नाराजी असल्याचं बोललं जात होतं. गुरुवारीच मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं होतं. त्याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही तारीख सांगणं टाळलं होतं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांची संख्या आता जवळपास ५० पर्यंत गेली असून, त्यांच्या अपेक्षा देखील मोठ्या आहेत.