Kumbhe Waterfall
Kumbhe Waterfall Lokshahi

Kumbhe Waterfall: रिल्स बनवणं तरुणीच्या जीवावर बेतलं! रायगडच्या कुंभे धबधब्यावर मोठी दुर्घटना

पावसाळी हंगाम सुरु झाल्यापासून अनेकांना धबधब्यावर पोहण्याचं वेड लागलं आहे. जीवाची पर्वा न करता डोंगर कपाऱ्यांमध्ये रिल्स आणि सेल्फी काढून काही पर्यटक आपला जीव धोक्यात घालतात.
Published by :
Naresh Shende
Published on

Kumbhe Waterfall Incident : पावसाळी हंगाम सुरु झाल्यापासून अनेकांना धबधब्यावर पोहण्याचं वेड लागलं आहे. जीवाची पर्वा न करता डोंगर कपाऱ्यांमध्ये रिल्स आणि सेल्फी काढून काही पर्यटक आपला जीव धोक्यात घालतात. अशाच प्रकारची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील माणगावच्या कुंभे धबधब्यावर घडली आहे. रिल्स बनवण्याच्या नादात दरीत पडल्यानं एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. अन्वी कामदार असं मृत तरुणीचं नाव आहे.

या घटनेबाबत माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे माध्यमांशी बोलताना म्हणाले,जेव्हा बचावकार्य सुरु केलं, त्यावेळी प्रचंड पाऊत तिथे पडत होता. मोठ्या प्रमाणात धुकं असल्यानं खाली काहीही दिसत नव्हतं. रेस्क्यू टीमच्या लोकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम सुरु केलं. २०-२५ मिनिटांत रेस्क्यू टीमचा एक सदस्य तिथे पोहोचला.

त्याठिकाणी एक मुलगी खाली पडली होती. त्यावेळी मुलगी हालचाल करत असल्याचा मेसेज त्यांनी दिला. त्यानंतर या मुलीला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. रेस्क्यू करण्यासाठी सहा तास लागले. त्या मुलीला रुग्णवाहीकेत टाकून रुग्णालयात दाखल केलं. परंतु, तिचा दुर्देवाने मृत्यू झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com