Pulwama चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार, दोन AK-47 जप्त
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) चकमक सुरू आहे. पोलिस,(Police) लष्कर, (Army) आणि सीआरपीएफच्या (CRPF) पथकाने, दहशतवाद्यांना घेराव घातला आहे. याचदरम्यान जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पुलवामा येथील मित्रीगाम भागात बुधवारी (28 मार्च) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली, या चकमकीत एक दहशतवादी मारला गेल्याची माहिती मिळाली. यानंतर गुरुवारी पोलिसांनी सांगितले की, पुलवामाच्या मित्रीगाम भागात सुरू असलेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी मारला गेला आहे. आतापर्यंत एकूण दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दोन AK-47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा (Pulwama) जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या मित्रीगाम भागात दहशतवादी (Terrorist) लपल्याची माहिती मिळाली होती. पुलवामा पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफ जवानांच्या मदतीने परिसरात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली.
काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, 'पुलवामा येथे सुरू असलेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी मारला गेला आहे. स्थानिक दहशतवादी एजाज हाफिज आणि शाहिद अयुब अशी ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. दहशतवाद्यांकडून दोन एके 47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
याआधी रविवारी (24 एप्रिल), जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातच सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत प्रतिबंधित संघटना लष्कर-ए-तैयबाच्या डेप्युटी कमांडरसह तीन दहशतवादी मारले गेले. यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आरिफ अहमद हजार उर्फ रेहान (लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर बासितचा उप), अबू हुजैफा उर्फ हक्कानी (पाकिस्तानी दहशतवादी) आणि श्रीनगरमधील खानयार येथील नथीश वानी उर्फ हैदर अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.