Ganesh Naik
Ganesh NaikTeam Lokshahi

भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा आरोप

24 तसात गणेश नाईक यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल; निवडणुकी आधीच नाईक यांची कोंडी करण्याचा मवीआचा प्रयत्न ?
Published by :
Vikrant Shinde
Published on

कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज:

हर्षल भदाने पाटिल नवी मुंबई : भाजपचे ऐरोली मतदार संघातील आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतेय. गेल्या 24 तसात त्यांच्यावर दुसरा गंभीर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांत त्यांच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. गणेश नाईक हे नवी मुंबईचे (Mumbai) जेष्ठ भाजपचे (BJP) नेते असून. त्यांच्यावर करण्यात आलेले हे आरोप अत्यंत गंभीर आहेत. मात्र अस असल तरी निवडणूक जवळ आल्या म्हणून हा राजकीय गेम असल्याचे त्यांच्या निकटवरतीयांकडून सांगण्यात येत आहे. तर गणेश नाईक यांची कोंडी करून त्यांना पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा देखील दुसऱ्या अंगाने सुरू आहे.

निवडणुकीआधीच नाईक यांची कोंडी करण्याचा मवीआ चा प्रयत्न?

दोन दिवसात दोन वेगळे वेगळं गुन्हे दाखल झाल्याने नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. गणेश नाईक नवी मुंबईतील जेष्ठ भाजप नेते आहेत.त्यांच्यावर एका महिलेकडून बलात्कारासारखा गुन्हा दाखल झाल्यामुळे नाईक यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत हे नक्की.यामुळे पालिका निवडणुकांच्या तोंडावर त्यांची राजकीय कोंडी झाली आहे हे मात्र खरं आहे. भाजपला नवी मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता मिळवून देण्याची सर्व भिस्त नाईक यांच्यावरच आहे. मात्र बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने नाईक हे बँक फूट वरती जाण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचारात विरोधक या मुद्द्याला तापवणार हे नक्की. पण गणेश नाईक हे कसलेले राजकारणी असल्याने ते या संकटातून कसे बाहेर पडतात हे पहावं लागेल. पण नाईक यांच्यावर दाखल झालेल्या या गुन्ह्यांमुळे विरोधकांच्या हातात आयत कोलीत सापडलं आहे. मात्र निवडणुका जवळ असल्याने नाईक यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असून या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

महिलेने केलेल्या तक्रारदाखल पत्रानुसार, गणेश नाईक (Ganesh Naik) हे सदर महिलेसोबत 27 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचा खळबळजनक आरोप या महिलेने केला आहे. तसेच गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यापासून त्यांना एक मुलगाही आहे. सध्या मुलाच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद म्हणून उपाययोजना करा असा तगादा लावल्याने गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप ही संबंधित महिलेने केला आहे. संबंधित पत्र महिलेने राज्य महिला आयोगाला पाठवल्या नंतर नेरुळ पोलिसांनी दूसरा गुन्हा दाखल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com