दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. ईडीकडून दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे म्हणाले की, दारू धोरणावरती मी अनेकवेळा पत्र लिहिलं आहे. माझा लिहिण्याचा उद्देश एकच होता. आज दारूमुळे महिलांवरती अन्याय होतात. अत्याचार होतात. त्याला आळा बसला पाहिजे. दारूमुळं भांडणतंटा वाढतात. मारामाऱ्या होतात.

ही दारूची नीती संपवली पाहिजे. पण त्याच्या डोक्यात बसलं नाही. त्याने दारूची नीती केली. शेवटी दारूनीतीमध्ये त्याला अटक झाली. आता जी अटक झाली ते सरकार आणि तो बघून घेतील. ज्यांची चूक झाली त्यांना सजा मिळालीच पाहिजे. चूक नसेल तर सजाचं काही कारण नाही. असे अण्णा हजारे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com