MP Girish Bapat : गिरीश बापटांच्या निधनाने अंकुश काकडे यांना अश्रू अनावर
खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्यावर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. त्यांचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचे निधन झाले. अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले.
राज्यातील अनेक नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. गिरीष बापट यांच्या निधनाची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांना अश्रू अनावर झाले आहेत.
अंकुश काकडे म्हणाले की, आजकालचे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले की त्यांच्याकडे संशयित नजरेने पाहिलं जातं पण गिरीश बापटांनी कधीही त्यांच्या पक्षाशी गद्दारी केली नाही. सख्खा भाऊ जेवढं प्रेम करणार नाही तेवढ गिरीश यांनी माझ्यावर प्रेम केलं. आजकालच्या गढूळ राजकारणात बापट यांच्यासारखी मैत्री आपण ठेवावी. राजकारण राजकारणाच्या जागी करावं पण राजकारणातही निखळ मैत्री कशी करावी हे गिरीश बापटांकडून शिकावं. असे अंकुश काकडे म्हणाले.