Anil Parab on Jogeshwari Rada | कार्यकर्त्यांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले, अनिल परबांचा आरोप

Anil Parab on Jogeshwari Rada | कार्यकर्त्यांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले, अनिल परबांचा आरोप

जोगेश्वरीतील राड्याच्या प्रकरणात अनिल परब यांनी पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची अटक आणि निवडणुक आयोगाच्या तक्रारीबद्दल जाणून घ्या.
Published by :
shweta walge
Published on

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये मंगळवारी रात्री शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाला होता. दोन्ही गट आमने-सामने येत जोरदार घोषणाबाजी आणि दगडफेक करण्यात आली होती. शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लबबाहेर हा राडा झाला होता. मातोश्री क्लबबाहेर झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर ३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. आता याप्रकरणात ठाकरे गटाच्या एका शिवसैनिकाला अटक करण्यात आली आहे. यावरच शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, काल झालेला प्रकार हा अत्यंत वाईट आहे. मातोश्री क्लब ही सरकारी प्रॉपर्टी आहे. त्या ठिकाणी पैसे वाटप करणं कितपत योग्य आहे. या प्रकरणाची आम्ही 6 तारखेलाच निवडणुक आयोगाकडे तक्रार केली होती. तरीही या प्रकरणाची दखल घेतल्या गेली नाही.

काल हा सर्व प्रकार आमच्या कार्यकर्त्यांनी स्वत:बघितला. आमच्या कार्यकर्त्यावर काल पोलीसांनी खोटे गुन्हे दाखल केले. या प्रकरणात आज मी डीसीपीची भेट घेतली. त्यांनी आश्वासन दिलंय की कोणावरही खोटे गुन्हे दाखल केले जाणार नाही. या प्रकरणात जो कोणी आरोपी सिद्ध होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com