ताज्या बातम्या
Andheri Gokhale Bridge : अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर स्थापित
अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर स्थापित करण्यात आला आहे.
अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर स्थापित करण्यात आला आहे. या पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे नववर्षात गोखले पूलची एक मार्गीका नागरिकांसाठी खुली होण्याची शक्यता आहे.
शनिवारी मध्यरात्री गर्डर स्थापित करण्यासाठी विशेष चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरीतील एक महत्त्वाचा पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूल आहे. पुलाचं पहिल्या टप्प्यातील काम 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या पुलाच्या प्रवेश मार्गिकांचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. गर्डर बसवल्यानंतर त्यावर सळयांचे काम करून सिमेंट-काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. हा संपूर्ण गर्डर 90 मीटर लांबीचा पूल साडेतेरा मीटर रुंद आहे.