ताज्या बातम्या
ऐन सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात वाढ; जाणून घ्या दर
ऐन सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ऐन सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आयात शुल्कातील वाढीमुळे तेल दरात 30 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला याची चांगलीच कात्री बसली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मलेशिया इंडोनेशिया या ठिकाणीही तेलाची मागणी आहे, त्यामुळे तेलाचे दर वधारले असल्याची माहिती मिळत असून खाद्य तेलाच्या दरात प्रतिकिलो 25 ते 30 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तेलाचे दर आता वधारले असून दिवाळीमध्ये तेलाला जास्त मागणी असते. त्यामुळे दिवाळीत तेल आणखी महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.