Manoj Jarange: आंतरवाली सराटीत आज मनोज जरांगेंची महत्त्वाची बैठक

Manoj Jarange: आंतरवाली सराटीत आज मनोज जरांगेंची महत्त्वाची बैठक

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या लढाईची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज (रविवार, 17 डिसेंबर) महत्वाची बैठक आंतरवाली सराटीमध्ये बोलावली आहे.
Published by :
shweta walge
Published on

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या लढाईची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज (रविवार, 17 डिसेंबर) महत्वाची बैठक आंतरवाली सराटीमध्ये बोलावली आहे. 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर मनोज जरांगे आज मराठा आंदोलकांशी चर्चा करणार आहेत.

मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टीमेटम 24 डिंसेबरला संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर आरक्षणासंदर्भात आपली भूमिका आणि पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज बैठक बोलावली आहे. सकाळी जवळपास 11 वाजता या बैठकीला सुरूवात होईल अशी माहिती आहे.

मनोज जरंगे यांनी सरकारला दिलेल्या 24 डिसेंबरच्या अल्टीमेंटमनंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाज बांधवांची राज्यव्यापी बैठक अयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला, राज्यभरातील संव्यसेवक, समनव्यक, सभांचे आयोजक, तसेच वकील, डॉक्टर आणि आरक्षण विषयातील तज्ज्ञ मंडळी असणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटीमध्ये झालेल्या ऐतिहासिक सभेच्या ठिकाणीच ही सभा अयोजित करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com