रंगीबेरंगी पाऊस पाडणारा फटाका पेटवताना झाला स्फोट; लहान मुलगा जखमी

रंगीबेरंगी पाऊस पाडणारा फटाका पेटवताना झाला स्फोट; लहान मुलगा जखमी

पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. काल रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शहरात झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजी ने शहरात 17 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

चंद्रशेखर भांगे, पुणे

पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. काल रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शहरात झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने शहरात 17 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या तर याच रंगबेरंगी फटाक्यांनी पुण्यातील नर्हे भागातील एक मुलगा जखमी झाला आहे. शिवांश अमोल दळवी अस या जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. काल रात्री दहा वाजल्यााच्या सुमारास ही  घटना घडली आहे.जखमी मुलाची प्रकृती आता ठिक असून पण इतर मुलांनी काळजी घ्यावी असं जखमी मुलाच्या नातेवाईकांकडून आवाहन करण्यात आलं आहे.

काल रात्री लक्ष्मीपूजन झाल्या नंतर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती.शिवांश हा रात्री घराच्या बाहेर फटाके फोडत असताना रंगबेरंगी पाऊस पडणारा फटाका फोडताना शिवांश हा जखमी झाला आहे.

गेल्या काही वर्षापासून सातत्याने पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.तसेच फटाके मुक्त दिवाळी साठी अनेक संस्था संघटनांच्या माध्यमातून जनजागृती देखील केली जाते.पण अस असल तरी अश्या या फटाक्यांच्या आतिषबाजी ने मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडत आहे.आत्ता या घटने नंतर पालकांनी देखील खबरदारी घेतली पाहिजे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com