अमूल ब्रँड आणि मदर डेअरीच्या दुधाच्या दरात पुन्हा एकदा महागाईचा तडाखा बसला आहे. अमूल आणि मदर डेअरीच्या दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेली किंमत 17 ऑगस्टपासून लागू होणार आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन, अमूल या ब्रँड नावाखाली दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे विपणन करत असून, अहमदाबाद आणि गुजरातमधील सौराष्ट्र, दिल्ली NCR, WB, मुंबई आणि इतर सर्व बाजारपेठांमध्ये दुधाच्या दरात 2 रुपये/लिटर वाढ केली आहे. (amul increases milk prices)
कंपनीच्या नवीन दरांनुसार, अमूल गोल्डच्या 500 ग्रॅमची नवीन किंमत आता 31 रुपये असेल, तर अमूल ताजाची 500 ग्रॅमची नवीन किंमत 25 रुपये असेल. याशिवाय अमूल शक्ती दुधाची नवीन किंमत ५०० ग्रॅमसाठी २८ रुपये असेल. दुधाचा खर्च आणि उत्पादन खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
याशिवाय मदर डेअरीने 17 ऑगस्टपासून आपल्या दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली आहे. नवीन दर सर्व प्रकारच्या दुधासाठी लागू असतील.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी कंपनीने यावर्षी 1 मार्च रोजी देखील अमूल दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली होती. त्यावेळीही कंपनीने पेट्रोल आणि डिझेलची वाढती महागाई हे दर वाढवण्याचे कारण सांगितले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत पशुखाद्याच्या किमतीत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे कंपनीने नमूद केले आहे. अमूलने एका निवेदनात म्हटले आहे की, "खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन आमच्या सदस्य संघटनांनी मागील वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या किमतीत 8-9 टक्क्यांनी वाढ केली आहे."