अमृता फडणवीसांचा खुलासा '…यासाठी देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजना सुरु केली'

अमृता फडणवीसांचा खुलासा '…यासाठी देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजना सुरु केली'

सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची चर्चा जागोजागी सुरू आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत.
Published by :
shweta walge
Published on

सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची चर्चा जागोजागी सुरू आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. अनेक महिलांना या योजनेचा लाभ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. रक्षाबंधनाच्या अगोदर म्हणजे 17 ऑगस्टपासून काही महिलांच्या खात्यात पैसे जमा देखील झाले आहेत. यावरच पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसांनी ही योजना लाडक्या बहि‍णींच्या रक्षणासाठी आणली आहे. त्यात कोणताही राजकीय दृष्टीकोन नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शकपणावर, प्रामाणिकपणावर आणि त्यांनी याआधी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार सारख्या चांगल्या योजनांवर विरोधकांनी टीका केली. त्यामुळे ते आताही टीका करत आहेत. सरकारने चांगल्या हेतूने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ते पुढेही ही योजना सुरु ठेवतील. तसेच त्यात आवश्यक वाढही देण्यात येईल, अशी अपेक्षाही मी व्यक्त करते, असं अमृता फडणवीसांनी सांगितले.

पुढे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेमुळे देवेंद्र फडणवीस यांना कोट्यावधी बहिणी लाभल्या आहेत. त्यामुळे मलाही तेवढ्याच नणंद मिळाल्या आहेत. यामुळे आता संपूर्ण राज्यातील बहिणींसोबत माझं नणंद-भावजय हे नातं निर्माण झालं आहे. हे नवीन नातं मला खूप आवडत आहे. त्यामुळे आता आपण एकमेकांचे सुख, दुःख वाटून घेऊ, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान, रक्षाबंधनानिमित्त भाजपच्या दिव्यांग आघाडीच्या वतीने आज नागपुरातील दिव्यांग बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी नागपुरातील दिव्यांग बांधवांना राखी बांधली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com