Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना 1 कोटीच्या लाच देण्याची ऑफर, डिझायनर विरोधात गुन्हा दाखल
Admin

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना 1 कोटीच्या लाच देण्याची ऑफर, डिझायनर विरोधात गुन्हा दाखल

अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाच देण्याची ऑफर दिली होती.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाच देण्याची ऑफर दिली होती. यावरुन सारखा त्रास दिला जात असल्याने अमृता फडणवीस यांनी डिझायनर महिलेच्या विरोधात मलबार हिल पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

अमृता फडणवीसांनी अनिक्षा नावाची डिझायनर आणि तिच्या वडीलांविरूद्ध मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या विरोधात १२०, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ती कपडे, दागिन्यांची डिझायनर आहे. तिने डिझाईन केलेले कपडे आणि दागिने सार्वजनिक कार्यक्रमात घालावे, अशी अनिक्षाने विनंती केली होती. 

त्यानंतर १६ फेब्रुवारीला अनिक्षाने फोन केला की, तिच्या वडिलांना एका प्रकरणात आरोप करण्यात आलं आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक कोटी रूपये देण्याची तयारी आहे. असे तिने सांगितले. तसेच २२ व्हिडीओ क्लीप, तीन व्हॉईस नोटस अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर आले असे अमृता फडणवीस यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com