फरार अमृतपाल नांदेडमध्ये? सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर
अमृतपाल सिंगला पकडण्यासाठी पोलिसांची सतत मोहीम सुरू आहे. त्यांच्या समर्थकांवरही तशीच कारवाई केली जात आहे. अमृतपाल सिंग शनिवारी फरार झाला होता. त्यानंतर त्याला फरार घोषित करण्यात आले. त्याचे काका हरजित सिंग आणि ड्रायव्हर हरप्रीत सिंग यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
अमृतपालला अटक करण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच आहे. पंजाब पोलिसांनी अमरीपाल सिंग यांच्या 7 समर्थकांना अटक केली आहे. वारिस पंजाब संस्थेचे कायदेशीर सल्लागार इमान सिंग खारा यांनी अमृतपाल सिंग यांना न्यायालयात हजर करण्याच्या मागणीबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांनी जालंधरच्या मेहतपूर भागात कार जप्त केली, ज्यामध्ये अमृतपाल शेवटचा दिसला होता. या कारमधून पोलिसांनी एक रायफल, गोळ्या आणि अमृतपालचा सबर जप्त केला आहे.
पंजाबमधून फरार झालेला अमृतपाल महाराष्ट्रातील नांदेडमध्ये लपून बसला असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यासाठी महाराष्ट्र पोलिसांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे. अमृतपाल पंजाबमधून पळून गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तो महाराष्ट्रातील नांदेडमध्ये असल्याचा संशय पोलिसांना आहे. पंजाबमधून पळून तो हरियाणाला गेला होता. अमृतपाल महाराष्ट्रातील नांदेडमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. शहरातील सर्व रस्ते, प्रवेश मार्ग आणि बाहेर जाण्यासाठी बॅरिकेड लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.