अमृतपाल सिंगला अखेर अटक; पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण

अमृतपाल सिंगला अखेर अटक; पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण

वारस पंजाब डी चीफ अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी अखेर 36 दिवसांनंतर अटक केली आहे.
Published on

चंदीगड : खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याने पंजाब पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. अमृतपाल गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. 36 दिवसांनंतर खलिस्तान समर्थक नेत्याने आज सकाळी पंजाबच्या मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. माहितीनुसार, आता अमृतपालला डिब्रूगडला नेले जाऊ शकते.

अमृतपाल सिंगला अखेर अटक; पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण
मलिकांच्या आरोपांवर अमित शाहांची पलटवार; म्हणाले, जनतेने आणि...

वारिस पंजाब डी प्रमुख अमृतपाल याच्यावर हत्येसह अनेक गुन्हे दाखल असून एनएसएही लावण्यात आले आहे. पंजाब पोलिसांनीही अमृतपालच्या अटकेची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. अमृतपाल सिंग 36 दिवसांपासून फरार होता. त्यामुळे त्याच्या शोधात शोधमोहीम सुरू होती.

वारस पंजाब डीच्या अमृतसरमधील सर्व साथीदारांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्याच्या साथीदारांची सतत चौकशी सुरू होती. पोलिसांनी पत्नीवर दबाव टाकण्यास सुरुवात केल्यानंतरच त्याने आत्मसमर्पण केल्याचे समजते.

दरम्यान, 18 मार्च रोजी पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. यावेळी पोलिसांनी त्याच्या अनेक साथीदारांना अटक केली मात्र अमृतपाल पळून जाण्यात यशस्वी झाला. तेव्हापासून पोलीस त्याचा सतत शोध घेत होते, मात्र तो सतत वेश बदलत होता. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com