अमरावतीत खासदार जनसंपर्क कार्यालयाचा वाद वाढला; महिला काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन

अमरावतीत खासदार जनसंपर्क कार्यालयाचा वाद वाढला; महिला काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन

अमरावतीत खासदार जनसंपर्क कार्यालयाचा वाद वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सूरज दहाट, अमरावती

अमरावतीत खासदार जनसंपर्क कार्यालयाचा वाद वाढल्याचे पाहायला मिळत आहे. महिला काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन केलं आहे. अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांना खासदार जनसंपर्क कार्यालय देण्याच्या मागणीसाठी महिला काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन करण्यात येत आहे.

20 दिवस उलटूनही बळवंत वानखडे यांना कार्यालय न दिल्याने काँग्रेस आक्रमक झाले असून आमदार रवी राणा आणि खासदार अनिल बोंडे जातीवाद करत असल्याचा काँग्रेसकडून आरोप करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांनी तालातोडो आंदोलन केलं होते. सध्या अमरावतीचं खासदार कार्यालय जिल्हाधिकारी व पोलिसांच्या ताब्यात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com