गूगलवर मंगळसूत्र चोर सर्च करा, त्यात किती रंजक माहिती येते पहा - अमोल मिटकरी
Admin

गूगलवर मंगळसूत्र चोर सर्च करा, त्यात किती रंजक माहिती येते पहा - अमोल मिटकरी

चोर या शब्दावरुन राजकारण चांगलेच तापले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

चोर या शब्दावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. जो तो आरोप प्रत्यारोप करत आहेत. महाराष्ट्राचे तीन भाग करा. एक लवासा, एक बारामती आणि एक मगरपट्टा. लवासाचे मुख्यमंत्री सुप्रिया सुळे तर बारामतीचे मुख्यमंत्री अजित पवार यांना करा. मग या तिन्हीचा मिळून एकत्र देश करा. त्या देशाचा पंतप्रधान शरद पवार यांना करा. असे भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती.

यावर आता अमोल मिटकरी यांनी हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे. पवारांचं नुसतं नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागतं असे म्हटले होते. आता परत मिटकरी यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, गुगल वर "मंगळसुत्र चोर" असे सर्च केल्यावर मिळालेली माहिती फार रंजक आहे बघा.. गुगल ला पण आता चोर मार्केट माहित झाले. अध्यक्ष महोदय आता गूगलवर काय कारवाई करणार असे ट्विट करत मिटकरी यांनी टोला लगावला आहे.

वादानंतर गोपीचंद पडळकर आणि विरोधी कार्यकर्त्यांचे एका लग्नसमारंभात वाद झाले होते. यावेळी धक्काबुक्की झाली होती. या प्रकारात काही महिलांचे मंगळसूत्र चोरल्याचे आरोपही करण्यात आले होते. अशी माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com