Amitabh Bachchan
Amitabh BachchanTeam Lokshahi

Amitabh Bachchan Gets Injured: महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात

महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे.
Published on

महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ॲक्शन सीन शुट करताना अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अमिताभ यांना ही गंभीर दुखापत झाल्याची ही बातमी अमिताभ यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. 

 'हैदराबादमध्ये मी 'प्रोजेक्ट के' (Project K) चं चित्रीकरण करत होते. दरम्यान, चित्रपटात एक अ‍ॅक्शन सीन होता आणि तो सीन शूट करत असताना मला दुखापत झाली. माझ्या बरगड्यांना मार बसला आहे आणि त्यासोबतच उजव्या बाजुच्या दोन बरगड्यांनमधल्या स्नायुंना दुखापत झाली आहे. त्यामुळे शूटिंग रद्द करण्यात आलं आहे. एआईजी रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि सीटी स्कॅन केला आहे. आता मी हैद्राबादवरून घरी परतलो आहे. पट्ट्या बांधल्या आहेत आणि त्यावर उपचार सुरु आहेत. हे खूप त्रासदायक आहे, मला श्वास घ्यायला आणि हलायला त्रास होतोय. तर प्रकृती सुधारण्यास आठवडे जातील. सगळं नीट होण्याआधी जो त्रास होतोय त्यावर गोळ्या सुरु आहेत' असे अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडियावरुन ब्लॉगमध्ये सांगितले आहे.

तसेच त्यांनी पुढे लिहिले आहे की, दुखापतीमुळे जे काही काम करायचे होते ते सध्या थांबवले आहे. उपचार पूर्ण होईपर्यंत सर्व काम बंद राहणार आहे. याक्षणी मी जलसामध्ये विश्रांती घेत आहे आणि सर्व आवश्यक कामांसाठी थोडासा मोबाईल आहे. मला आज संध्याकाळी जलसा गेटवर चाहत्यांना भेटता येणार नाही. त्यामुळे येऊ नका. असे त्यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com