Amit Shah : अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

Amit Shah : अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. अमित शाह नागपूर, संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

दुपारी दोन वाजता नागपुर विमानतळावर अमित शाह यांचे भव्य स्वागत करण्यात येणार असून रेशीम बागेतील डॉ हेडगेवार स्मृती स्थळाला भेट देऊन सुरेश भट सभागृहात आढावा बैठकीत अमित शाह सहभागी होणार आहेत.

या बैठकीसाठी विदर्भातील 62 विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अमित शाह मंडळ प्रमुख, विधानसभेचे प्रभारी, आणि निवडणुकीची जबाबदारी असणाऱ्या कार्यकर्त्याची संवाद साधून मतदार संघनिहाय आढावा घेतील तसेच विधानसभेच्या तयारीबाबत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com