Ambadas Danve : विद्यार्थ्यांना केलेल्या गणवेश पुरवठ्यावरुन अंबादास दानवे ट्विट करत म्हणाले...

Ambadas Danve : विद्यार्थ्यांना केलेल्या गणवेश पुरवठ्यावरुन अंबादास दानवे ट्विट करत म्हणाले...

विद्यार्थ्यांना केलेल्या गणवेश पुरवठ्यावरुन अंबादास दानवे यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विद्यार्थ्यांना केलेल्या गणवेश पुरवठ्यावरुन अंबादास दानवे यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी एक फोटो ट्विट करत म्हणाले की, या चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे. महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे!

पहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्ट ला.. काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा शिक्षण मंत्री @dvkesarkar जी. विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवली आहे.

१५ ऑगस्ट २०२४ पर्यंत ४५ लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ २४ लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. ते ही हे असले बोगस!

यासोबतच ते पुढे म्हणाले की, कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत. असे अंबादान दानवे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com