Ambadas Danve : घोषणांच्या पावसात महाराष्ट्र भिजला, योजनांचा महापूर नदीत वाहून गेला
राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, घोषणांच्या पावसात महाराष्ट्र भिजला, योजनांचा महापूर नदीत वाहून गेला. महाराष्ट्रासाठी केलेल्या घोषणांचा पाऊस झाला खरा.. पण यातील किती योजना अंमलात येतील यावर शंका आहे. हा अर्थसंकल्पातून शुद्ध 'पोलिटिकल हिप्नॉटिझम' चा प्रकार जास्ती आहे. आजचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकून मला पक्का विश्वास बसला आहे की हे सरकार मराठवाड्याला, विदर्भाला महाराष्ट्राचा भाग मानत नाही.
यासोबतच ते म्हणाले की, पर्यटन, पायभूत सुविधा, वैद्यकीय सेवा आदी गोष्टींतून मराठवाडा,विदर्भ या सरकारने बाद ठरवला आहे. 'सुसूत्रता' आणायच्या नावाखाली स्थापन केलेल्या समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून जबर कर लादण्याचा सरकारचा छुपा मनसुबा आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेने ओळखून घ्यावे. असे अंबादास दानवे म्हणाले.