Ambadas Danve: अंबादास दानवेंचा सरकारवर टीकास्त्र, म्हाणाले...
सगळ्यात महत्त्वाचे माझ्या मागच्या वेळचे जे पेपर सरकारने प्रसिद्ध केले ते माझ्याकडे आहेत. सरकारने जी पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी घेतली होती ती जशीच्या तशी माझ्याकडे आहे. तिच्यात त्यांनी सांगितलेलं आहे त्यातलं काय काय नाही झालं ते सांगतो. याच्यात प्रामुख्याने मी जे सांगितले की 5 टक्के सुद्धा निधी आलेला नाही. त्याच्यानंतर रस्त्याच्या बाबतीत जे धोरण होतं अजून हे रस्ते होणार की नाही होणार डांबरी रस्त्यावरचे सीमेंटचे रस्ते करण्याची घोषणा केली होती सरकार पुढे गेलेलं नाही.
नांदेड येथील गोदावरी नदी, साबरमती नदीच्या धरतीवर विकसित करण्याची घोषणा केली होती तिला अजून सरकारला मुहूर्त मिळालेला नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं तुळजाभवानीच्या मंदिर विकासाच्या आराखड्यासाठी घोषणा केली होती याच्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. कलाग्राम येथे क्रिकेटचे स्टेडिअम उभआरण्यात येणार होते याच्याबाबतीतही कोणताही निर्णय झालेला नाही. 18 निजाम पोलीस ठाण्याचे कायापालट करणार असं सांगितलं होतं अजूनही या पोलीस ठाण्याला निजाम काळातच ठेवण्यात आलेलं आहे.3400 अंगणवाड्यांचे 386 कोटी खर्च करणार सांगितलं होतं एकही अंगणवाडीला यातला एकही रुपया मिळालेला नाही.