ताज्या बातम्या
ॲमेझॉन कंपनीत नोकरकपात, 10,000 कर्मचाऱ्यांना हटवणार
मायक्रोसॉफ्ट नंतर ट्विटर आणि त्यानंतर फेसबुकची मालकी असलेली मेटा या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून हटवलं आहे.
ॲमेझॉन कंपनीच्या विक्रीमध्ये घट झाली आहे, त्यामुळे कंपनी खर्च करण्याच्या तयारीत आहे. अनेक कंपन्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. या कंपन्यांकडून अचानक झालेल्या नोकरकपातीमुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर आता ॲमेझॉनही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यापासून कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्यात येईल.
31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार ॲमेझॉन कंपनीमध्ये सुमारे 16,08,000 कर्मचारी आहेत. कंपनीने 10 हजार कर्मचारी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ॲमेझॉन कंपनी जगभरात 1.6 मिलियन लोकांना रोजगार देते.