अर्थसंकल्पमध्ये महाराष्ट्राची घोर निराशा व अन्याय राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या खासदार अमर काळे यांची टीका

अर्थसंकल्पमध्ये महाराष्ट्राची घोर निराशा व अन्याय राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या खासदार अमर काळे यांची टीका

आज जो केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीताराम यांनी संसदेत मांडला आहे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची घोर निराशा झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

भूपेश बारंगे | वर्धा: आज जो केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीताराम यांनी संसदेत मांडला आहे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची घोर निराशा झाली आहे. या दोन कुबड्यांवर हे सरकार सध्या सुरू आहे. एक बिहार आणि एक आंध्र प्रदेश या दोन राज्यांना अतिशय झुकतं माप या अर्थसंकल्पात देण्यात आलं आहे. सर्वांच्या निर्देशनात आलं आहे. दुसरी गोष्ट या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून स्पष्ट झाली आहे की येणाऱ्या ऑक्टोंबरमध्ये विधानसभेच्या निवडणूक आहे.

या महाराष्ट्रामध्ये 100% महाविकास आघाडी जिंकणार आहे. यावर आज शिक्कामोर्तब झालेला आहे. देशातल्या केंद्र सरकारला ही गोष्ट माहित आहे, महाराष्ट्रामध्ये काहीही केलं त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा शंभर टक्के पराभव होणार आहे. हे भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना माहीत असल्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रावर अन्याय केले आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. हा जर बघितलं सर्वात जास्त शेअर महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रावर सुद्धा दुर्लक्ष केले आहे.

शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याच्या संदर्भात घोषणा करण्यात आल्या, परंतु शेतकऱ्याची खऱ्या अर्थाने परचेसिंग कॅपॅसिटी जी पाहिजे ती परचेसिंग कॅपॅसिटी शेतकऱ्यांची नाही आहे. युवकाच्या संदर्भात अॅप्रिसिएटची घोषणा करण्यात आली एक वर्षा करिता आहे. त्यानंतर पुढचं भवितव्य काय या संदर्भातील ठोस पाऊल नव्हती संपूर्ण घटकांचा घोर निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे आणि महाराष्ट्रावर अन्याय करणारा हा अर्थसंकल्प आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com